Shirur Accident News : तळेगाव ढमढेरे, (पुणे) : तळेगाव ढमढेरे-न्हावरे या राष्ट्रीय महामार्गावर तोडकरवस्ती ग्रामपंचायत हद्दीत पिकप (टेम्पो) व कारच्या भीषण अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. ०३) सायंकाळी घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
मृत तिघेही अहमदनगर जिल्ह्यातील
या अपघातात कारमधील कविता बोरुडे (४०), योगिता बोरुडे (४०) आणि कारचालक राजू शिंदे (२५, तिघेही रा. कात्राबाज मांडवगण, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
तर कुमारी किशोरी सुनील बोरुडे (वय १७) ही जखमी झाली आहे. तसेच पिकप मधील चालक श्रीराम बापू मांडे व धीरज कांतीलाल लोखंडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत. (Shirur Accident News) जखमींवर शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर असणाऱ्या तोडकर वस्ती येथे वेगात असलेले टेम्पो आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. (Shirur Accident News) या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तीन जन गंभीर जखमी झालेले आहेत.
दरम्यान, जखमींवर शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. पिकप चालक श्रीराम बापू मांडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) यांचे विरुद्ध अविनाश निवृत्ती बोरुडे यांनी रात्री उशिरा शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. (Shirur Accident News) पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पारंपारीक वेशभूषा व हरिनामाच्या गजराने मुर्तीची सवाद्य मिरवणूक