अक्षय भोरडे
Shikrapur News तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या सर्व गावांत येणाऱ्या मुस्लीम धर्मियांच्या पवित्र बकरी ईदच्या दिवशी हिंदू धर्मातील पवित्र आषाढी एकादशी असल्याने कोणीही आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करणार नसल्याचा निर्णय सर्व मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.
शिक्रापूर परिसरातील मुस्लीम बांधवांचा अनोखा निर्णय
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने शांतता बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी शिक्रापूर मस्जिद ट्रस्टचे शिराजभाई शेख, मौलाना जाकीर हुसेन, मौलाना शौकत, तळेगाव ढमढेरे मस्जिद ट्रस्टचे मुनीर मोमीन, अब्दुल मन्नाव, (Shikrapur News) कोरेगाव भीमाचे जमीर इनामदार, पाबळचे बद्रूद्दीन इनामदार, टाकळी भीमाचे अशपाक मोमीन, केंदूरचे मकबूल मुलाणी, महमदशफी मोमीन, बाबुभाई मोमीन यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सह आदी विषयांवर चर्चा होत असताना शासनाची परवानगी नसलेले गोवंश कत्तल करु नये असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले. (Shikrapur News) दरम्यान आपल्या परिसरात कधीही गोवंश कत्तल होत नसून आम्ही सर्व समाजाचे नागरिक सामाजिक एकोप्याने वावरत असून आमच्या पवित्र सण बकरी ईदच्या दिवशीच हिंदू धर्मातील पवित्र आषाढी एकादशी आलेली असल्याने आम्ही बकरी ईद अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी पशुधनाची कुर्बानी करणार नसल्याचे सर्व मुस्लीम बांधवांनी जाहीर केले.
मुस्लीम बांधवांच्या निर्णयाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी स्वागत करत कौतुक केले, (Shikrapur News) तर मुस्लीम बांधवांनी जाहीर केलेल्या निर्णयाबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur News : जबरीचोरी, घरफोडी करणारा अट्टल चोरटा शिक्रापूर पोलिसांकडून जेरबंद ; ८ गुन्हे उघडकीस