अक्षय भोरडे
Shikrapur News : तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीवरील बंधाऱ्यामध्ये शिक्रापूर ग्रामपंचायतीची पाणी वापरासाठी टाकण्यात आलेली विद्युत मोटार चोरी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१५) उघडकीस आली आहे.
अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
ग्रामपंचायत कर्मचारी सिकंदर इस्माईल शेख (वय ४२ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख हे मोटार चालू करण्यासाठी गेले असता, त्यांना विद्युत मोटार दिसली नाही, त्यांनतर त्यांनी चौकशी केली असता (Shikrapur News) नदीवरील बंधाऱ्यामध्ये टाकण्यात आलेली मोटार चोरीला गेल्याचे निदर्शनास आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur News : पंजाबमधील राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत शिक्रापूरच्या दहा विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Shikrapur News : शिक्रापुरातील महिला देव दर्शनाला गेली अन् चोरट्यांनी घरावर मारला डल्ला..