Shikrapur News : शिक्रापूर : येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी तलाठी कार्यालयात जाऊन महिला तलाठी यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे माजी उपसरपंच रमेश राघोबा थोरात यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. (Shikrapur woman Talathi Atrocity case against former deputy sarpanch; No arrest even after rejection of bail)
अटक करण्यासाठी पथक नेमले
या घटनेस वीस दिवस उलटून गेले आहेत. विशेष न्यायालयाने त्यांना जामिन फेटाळल्यानंतरही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. (Shikrapur News) दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी आता एक पथक तयार केले असून, ते तपासाकामी रवाना केल्याने लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.
रमेश थोरात यांनी येथील महिला तलाठी सुशीला गायकवाड यांना जातिवाचक शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा आणल्याने त्यांच्यावर २० दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता तलाठी सुशीला गायकवाड यांची बाजू मांडणारे ॲड. नीलेश वाघमोडे, ॲड.राकेश सोनार, ॲड.महेश देशमुख यांनी आरोपी रमेश थोरात यांना जामीन मंजूर केल्यास त्यांच्यासह त्यांचे साथीदार फिर्यादी तलाठी यांच्यावर दबाव आणतील हे न्यायालयात पटवून दिल्याने विशेष न्यायाधीश जी.ए.रामटेके यांनी रमेश थोरात यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. (Shikrapur News) तरीही थोरात अटक झाली नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेत फरार थोरात यांना अटक करण्यासाठी एक पथक नेमले असून ते थोरातांच्या मागावर रवाना झाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
तलाठी सुशिला गायकवाड या कार्यालयात कामकाज करीत असताना माजी उपसरपंच रमेश थोरात कार्यालयात आले, त्यांनी तलाठी गायकवाड यांना माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले, तरी तुम्ही नोंदणी का करत नाही असे म्हणून महिला तलाठी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.(Shikrapur News) त्यांनतर गायकवाड यांना जातीवाचक बोलून तलाठी कार्यालयातील कागदपत्रे फेकून देऊन रागाने बोलून दरवाजात जाऊन शिवीगाळ, दमदाटी करुन यांची बदलीच करतो असे म्हणून निघून गेले.
घडलेल्या प्रकाराबाबत शिक्रापूरच्या तलाठी सुशीला शंकर गायकवाड (वय ४१, रा. विकास सदन, खंडोबा मंदिर जवळ वडगाव मावळ ता. मावळ) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य रमेश राघोबा थोरात (रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. (Shikrapur News) मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur News : जबरीचोरी, घरफोडी करणारा अट्टल चोरटा शिक्रापूर पोलिसांकडून जेरबंद ; ८ गुन्हे उघडकीस