लोणी काळभोर, (पुणे) Loni Kalbhor News : महाराष्ट्र दिनानिमित्त जनहित सोशल फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार दर्शन या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते व सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी दिली. (Loni Kalbhor News) तसेच विविध क्षेत्रात नामांकित कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्राभिमान पुरस्कार २०२३ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. (Loni Kalbhor News) असेही काळभोर यांनी सांगितले. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Loni Kalbhor News)
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हॉटेल एस फोरजीत पत्रकार परिषद संपन्न
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हॉटेल एस फोरजी या ठिकाणी रविवारी (ता. ३०) सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरील माहिती प्रवीण काळभोर यांनी दिली. यावेळी भाजपा सोशल मिडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, फाउंडेशनचे पदाधिकारी राजेंद्र हाजगुडे, विशाल वेदपाठक, आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
यापुढे बोलताना काळभोर म्हणाले, “या कार्यक्रमाचे पुरस्कार हे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे हे असून प्रमुख वक्ते हे सुप्रसिद्ध व्याख्याते व सिनेअभिनेते शरद पोंक्षे हे असणार आहेत. या कार्यक्रमाला दौंडचे आमदार राहुल कुल, सांगोलाचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, एमाआयटीचे संचालक राहूल कराड, आदी उपस्थित राहणार आहेत.
हे पुरस्कार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, कु. प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी बागडी, जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन केलेल्या निखील लांडगे, किरण पोपळघट, निलेश शिवरकर, पूजा पवार, स्नेहल थेऊरकर, यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सदर कार्यक्रमाचे आयोजन जनहित सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून हा कार्यक्रम कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एंजल शाळेजवळ घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला मान्यवरांनी व लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावावी असे आवाहन प्रवीण काळभोर यांनी केले आहे.