पुणे: लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पांच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत ७ मे ला रॅली होणार आहे. शिरुर, हवेली, हडपसर, आंबेगाव, शिरुर, खेड, आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांची प्रत्येकी एक सभा होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर विधानसभा-३० एप्रिल – ओतूर बाजार (ता. जुन्नर), हडपसर विधानसभा-६ मे रोजी कात्रज, भोसरी विधानसभा- ७ मे रोजी आदित्य ठाकरे यांची रॅली, आंबेगाव – शिरूर विधानसभा- ८ मे रोजी रांजणगाव (ता. शिरूर), खेड आळंदी विधानसभा- १० मे रोजी चाकण बाजार समितीच्या आवारात सभा होणार आहेत. या सभा घेऊन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आपले राजकीय अस्तित्व पणाला लावून काय व्युव्हरचना आखणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.