Pune News : पुणे : हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जाताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून ( minor reason) डोक्यावर आणि खांद्यावर(head and shoulder) कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न (Attempted murder) करणार्या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी (Additional Sessions Judge S. G. Vedpathak)सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड (seven years of hard labor and a fine of five thousand) सुनावला.
आरोपींची नावे
प्रशांत गणेश पासलकर (28, रा. जगताप आळी, महाराष्ट्र चौक, ता. पुरंदर जि. पुणे) आणि विशाल संजय पवार (32, रा. इंदिरानगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत याबाबत सासवड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दामोदर सर्जेराव जगताप (57, रा. महाराजा चौक, कोडीत नाका, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर खुनी हल्ला करण्यात होता. खटल्यात सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले.
फिर्यादी दामोदर जगताप हे एसटी महामंडाळात मॅकॅनिक म्हणून नोकरीस होते. 15 डिसेंबर 2015 रोजी त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते पुण्यात कामासाठी येऊन पुन्हा सायंकाळी सहा वाजता सासवड येथे आले होते. नेहमी प्रमाणे ते घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या दत्तात्रय सुभागडे यांच्या स्टो टीन मेकर्स दुकानात गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी साडे आठच्या सुमारास त्यांना लघुशंका आल्यामुळे ते जवळच असलेल्या यशराज हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जात असताना तेथे त्यांचा धक्का गणेश पासलकर याला लागला. त्याच्यात बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी कोयते काढून जगताप यांच्यावर वार केले. रक्तभंबाळ अवस्थेत ते पळत टेरेसवर गेले. तेथे त्यांनी टेरेसचा दरवाजा लावून मुलाला फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यावेळी मुलगा तात्काळ तेथे आला. त्याने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.
परंतु, दोघेही हवेत कोयते फिरवत निघुन गेले. यावेळी त्यांना नागरिकांनी पाहिले. त्यानंतर जगतापउपचरासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.अतिरिक्त सरकारी वकील सुनिल हांडे यांनी 9 साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय पुरावे आणि फिर्यादी यांची साक्ष महत्वाची ठरली.
दरम्यान, या खटल्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक फौजदार संदीप चांदगुडे, सहायक फौजदार विद्यादर निचीत यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Saswad Crime : तुझे बाहेर संबंध आहेत म्हणत पतीने घेतला पत्नीच्या हाताचा चावा ; सासवड मधील प्रकार