पुणे : नगर नागरी सहकारी पतसंस्था हडपसर, पुणे या संस्थेच्या स्विकृत संचालकपदी साहेबराव खामकर यांची निवड करण्यात आली आहे. नगर नागरी पतसंस्थेची स्थापना सन २००२ मध्ये झालेली असून लेखापरिक्षण वर्ग सतत ‘अ’ आहे. व सभासदांना सातत्याने पंधरा टक्के लाभांश दरवर्षी दिला आहे.
संस्थेचे स्वत:चे मालकीचे सुसज्ज असे कार्यालय असून सर्व कार्यालयीन कामकाज संगणकीकृत आहे. खामकर यांना सहकार क्षेत्रातील सुमारे अडोतीस वर्षाचा अनुभव असुन ते सहकारी साखर कारखान्यातुन कार्यकारी संचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.
दरम्यान, खामकर यांच्या निवडीमुळे पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. विजय मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांची ही निवड सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी आहे.