भिगवण (पुणे) : मोर्फा कंपनी ही एक राज्यामध्ये सेंद्रिय शेतीवर काम करणारे अॅग्रो प्रोडूसर कंपनी आहे. या कंपनीच्या अध्यक्ष अंकुश पडवळे, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद काका वरी तज्ञ संचालक योगेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शेतकऱ्याला येणाऱ्या अडी अडचणीसाठी राज्यस्तरावर आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी काम करते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 22 तारखेला शिवाजीनगर अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये डॉ. शेरामना सभागृहामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षपदी कुंडलिक धुमाळ यांची निवड करण्यात आली.
दरवर्षी मार्चमध्ये होणारी मीटिंग निवडणुकीमुळे झाली नव्हती. ती मिटींग 2 जून रोजी घेण्यात आली. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी उपस्थित होते. प्रत्यक्ष शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन शरद पवारांनी त्यावरती समाधानकारक उत्तर दिले. तसेच येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्याच्या कृषीमंत्री बरोबर मीटिंग घेतली जाईल, असेही सांगितलं.
सेंद्रिय मालाचा मार्केटिंग बरोबरच शेतीचे गुणवत्ता याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. या कंपनीचे ऑफिस दुबईमध्येही असल्याने अनेक शेतकरी आपला शेतीमाल एक्सपोर्ट करतात. यावेळी कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व पदाधिकारी व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी उपस्थित होते.