पुणे : 17 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ओमान (जॉर्डन) येथे 22 ते 30 जून दरम्यान होत आहे. या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी आज 7 जून रोजी दिल्ली येथे दिल्ली येथे संपन्न झाली. या निवड चाचणीत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडुन जाणता राजा कुस्ती केंद्राचे 5 कुस्तीगीर सहभागी झाले होते. त्यापैकी 3 कुस्तीगीरांनी नेत्रदीपक कामगिरी करत कुमार आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी स्थान मिळवले.
कुमार आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडलेले हे तीनही कुस्तीगीर जाणता राजा कुस्तीगीर केंद्राने सुरू केलेल्या मिशन ऑलिंपिकचे दत्तक कुस्तीगीर आहेत. या कुस्तीगीरांचा निवास, भोजन, खुराकाचा सर्व खर्च जाणता राजा कुस्ती केंद्र करत आहे. जाणता राजा कुस्ती केंद्राने 3 वर्षापुर्वी मिशन ऑलिंपिक ही योजना सुरु केली असुन एकुण 10 कुस्तीगीर या योजनेसाठी दत्तक घेतले आहेत.
ही योजना सुरु केली, त्यावेळी योजनेसाठी निवडलेला एकही कुस्तीगीर जिल्हा पातळीवर खेळलेला नाही, मात्र, आता 10 पैकी 7 कुस्तीगीरांनी राष्ट्रीय पातळीवर पदके प्राप्त केली आहेत.
निवड झालेले कुस्तीगीर खालील प्रमाणे
फ्रीस्टाईल :
48 किलो-पै. विशाल शिळीमकर
51 किलो-पै. रोहन भडांगे
65 किलो- पै. ओमकार काटकर
या कुस्तीगीरांना जाणता राजा कुस्ती केंद्राचे वस्ताद पै. संदीप भोंडवे, एन. आय. एस. कुस्ती कोच महीपत कुंडु, पै. सुरज तोमर व पै. संतोष यादव, पै. सचिन पलांडे यांचे मार्गदर्शन लाभले.