व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, May 23, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 June 2024, 19:43
Amit Shah Rejects Devendra Fadnavis Offer To Resign Asks Him To Continue

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. अखेरीस आज (दि. ७) त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी अमित शहा यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला फडणवीसांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी नवी दिल्ली एनडीएमधील सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिते चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्तास देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे. तसेच फडणवीस यांना आपले काम सुरूच ठेवण्याचे निर्देश देखील शहांनी दिले आहेत.

तुमचे काम सुरु ठेवा, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ आणि चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही काम करत राहा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. गुरुवारी अपूर्ण चर्चा शुक्रवारी दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली.

देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्र राज्यात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करु. पण, तोपर्यंत तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक

दिल्लीमध्ये आज शुक्रवारी (दि. ७) भाजपप्रणित एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच घटकपक्षांनी नरेंद्र मोदींच्या नेतेपदाला पाठिंबा दिला. त्यामुळे, नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठक झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीत राज्यात झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने व पुढील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते.

प्रत्येक मतदारसंघात पोहोचण्याचा फडणवीस प्रयत्न करणार
पुढील चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करून ती बळकट करण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आपल्याला राज्य सरकारमधून मोकळे करा, असा आग्रह फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केला आहे. परंतु, ही मागणी अमित शहांनी फेटाळली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जनादेश यात्रा काढण्याचा देवेंद्र फडणवीसांनी निश्चय केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मोठी बातमी..! आता शेतरस्त १२ फुटांचा असणार; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Friday, 23 May 2025, 22:41

पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखा 5 ची कारवाई

Friday, 23 May 2025, 20:37

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक..! ४ माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली पोलिसांना मोठे यश

Friday, 23 May 2025, 20:03

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक स्वबळावर लढण्याचा प्रफुल्ल पटेल यांचा नारा, वरिष्ठांची भूमिका काय असणार?

Friday, 23 May 2025, 18:56

हडपसर येथील रविदर्शन चौकात झालेल्या अपघातात जेष्ठ महिलेचा मृत्यू ; लोणी काळभोर येथील टेंम्पो चालकाला अटक

Friday, 23 May 2025, 18:55
Who is 'New Baba Vanga' Ryo Tatsuki? know here

जपानी बाबा ‘वेंगा’ यांच्याकडून मोठी भविष्यवाणी! २०११च्या त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी २ महिन्यांनी येणार, जी विनाश घडवणार

Friday, 23 May 2025, 18:46
Next Post

जाणता राजा कुस्ती केंद्राच्या 3 कुस्तीपटूंची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.