पुणे : शेवाळवाडी- हडपसर येथे १७ एप्रिल रोजी खाजगी सिक्युरिटी एजन्सी चालकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. सुधीर शेडगे असं जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. अरोपी तर्फे ॲड. राकेश सोनार यानी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी जयवंत खलाटे व आरोपी सुधीर शेडगे हे हडपसर येथे राहण्यास आहेत. हे दोघेही माजी सैनिक आहेत. तसेच सैन्य दलातून निवृत्त झाल्यांनतर दोघेही आपापली स्वतःची खाजगी सुरक्षा सिक्युरिटी एजन्सी चालवत होते. यांच्यात झालेल्या व्यावसायिक वादातून आरोपीने स्वतःजवळ असलेल्या बंदुकीतून जयवंत खलाटे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागली. या घटनेत जयवंत खलाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
आरोपी सुधीर शेडगे आणि मुलगा ऋषिकेश या दोघांनी संगनमत करून जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी सुधीर शेडगे यांनी बदुकीतून गोळ्या झाडल्याच्या आरोपावरून हडपसर पोलीस ठाण्यात १७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपींना १७ एप्रिल रोजी हडपसर पोलिसांनी अटक केली होती.
गुन्ह्याच्या तपासावेळी पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज हस्तगत केले. या फुटेजची तपासणी करून घडलेली घटना न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने आरोपी सुधीर शेडगे यांना अटी व शर्तीवरती जमीन मंजूर केला आहे.