युनूस तांबोळी / शिरूर : चालु शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परिक्षा सध्या सुरू असून २७ आक्टोंबर पासून शाळांना सुट्टी लागणार आहे. १० नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना १४ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाप्रमाणे २७ आक्टोंबर पर्यंत पहिल्या सत्रातील परीक्षा संपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या अनेक शाळांच्या परिक्षा सुरू होत असून उर्वरित काही शाळांच्या परिक्षा या आठवड्यापासून सुरू होणार आहे. दिवाळी पुर्वी होणाऱ्या पहिल्या सत्र परिक्षेपुर्वी शाळांनी विद्यार्थ्य़ांची पुर्व तयारी करून घेतली आहे. सध्या तोंडी, प्रात्यक्षिक तसेच सराव २५ ते २७ आक्टोंबर पर्यंत सर्वच शाळांच्या प्रथम सत्राच्या परिक्षा संपतील असे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळी नंतर निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने शाळांनी विध्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
या वर्षी विद्यार्थ्यांना सुट्या मिळाल्या असलयातरी १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून परीक्षांना सामोरे जायचे आहे. वेळेचे नियोजन हे परिक्षेसाठी महत्वाचे आहे.
सुनील जाधव – मुख्याध्यापक, जय मल्हार हायस्कूल, जांबूत, ता. शिरूर