Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन, यवत, दौंड येथे दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 14 October 2024, 21:20

उरुळी कांचन, (पुणे) : कानगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या दोघांना यवत व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोटारसायकली असा एकुण 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सिध्दू रसिकलाल चव्हाण (वय -19, रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) व बाबुशा गुलाब काळे (वय – 21, रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत फोटया उर्फ बंडू काळे, हनुमंत फोटया उर्फ बंडू काळे (रा. दोघेही, राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) दिपक रसिकलाल चव्हाण (रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी उरुळी कांचन, यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी, घरफोडीचे 20 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगाव हद्दीत रेल्वेपुलाजवळ शुक्रवारी (ता. 14) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे इसम हत्यारे व मोटार सायकली घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार यवत पोलिसांचे पथक व गुन्हे शोध पथक यांनी सदर ठिकाणी जाउन पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी दरोडेखोरांनी गावातील लोक येत असल्याचे पाहून स्वतःच्या दोनमोटार सायकलला आग लावून पळून जाऊ लागले.

यावेळी पळून जाताना पोलिसांनी एकाला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सिध्दू चव्हाण असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळुन आला. त्यास त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांबाबत विचारले असता त्याने त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. पळुन गेलेल्या आरोपिंचा शोध घेत असताना पोलिसांनी बाबुशा काळे हा दौंड पोलीस स्टेशन हद्दीत मिळुन आला.

 

दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सर्वजण कानगांव येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलो होतो. तसेच अंधार होण्याची वाट पाहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी यवत, दौंड, उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्यावेळी घरफोड्या, दरोडा, जबरी चोऱ्या केल्या असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोटारसायकली असा एकुण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, किशोर वागज, सहा.फौजदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे, हिरालाल खोमणे, गुरूनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, रामदास जगताप, विकास कापरे, मारुती बाराते, गणेश मुटेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, विजय कांचन, राजु मोमीण यांनी केलेली आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

देशी गायीला "राज्यमाता गोमाता" दर्जा; गाईचे पूजन करून वरवंडकरांनी मानले सरकारचे आभार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp