पुणे – सीबीएसई परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मात्र या निकालानंतर पुण्यातील पी. जोग शाळेत एकच गोंधळ उडाला आहे. पी. जोग शाळेने दहावीचा खोटा निकाल लावल्याचा पालकांनी आरोप केला आहे. सीबीएससीच्या पहिल्या सेमिस्टर चे पेपर न घेताच शाळेने निकाल जाहीर केल्याचा आरोप पालकांनी केला आहे
शाळेने केवळ सेमिस्टरवर दहावीचा निकाल लावला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेने नापास केले आहे. या चुकीच्या निकालामुळे आमची मुले घाबरलेली आहेत. त्यांना काय झाले तर याची जबाबदारी कोण घेणार असे पालकांनी म्हटले आहे.
तसेच शाळेने केवळ सेमिस्टर परीक्षेवर निकाल लावला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झालेले आहेत. त्यामुळे नापास मुले घाबरली आहे. निकालानंतर पालकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहे. मात्र शाळा या आरोपावर कोणत्याही प्रकारचे उत्तर देता नाही.
दरम्यान, विद्यार्थ्यांना खोटे मार्क देत रिझल्ट लावून ९० टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा केवळ ६० टक्के निकाल लावल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. या सगळ्या संतप्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केला आहे.