सासवड : सासवड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. बाबासो पिलाणे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. गणेश उरणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये ॲड. पिलाणे आणि ॲड. उरणे यांची निवड झाली.
सासवड बार असोसिएशनच्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. दशरथ घोरपडे विरुद्ध ॲड. बाबासो पिलाणे यांच्यात लढत झाली. या लढतीत ॲड. पिलाणे यांचा एका मताने विजय झाला तर उपाध्यक्षपदासाठी ॲड. गणेश उरणे व ॲड. अशोक भोसले यांच्यात लढत होऊन ॲड. उरणे ५२ मतांनी विजयी झाले. बार असोसिएशन निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. लक्ष्मण गायकवाड, ॲड. दिगंबर पोमण यांनी कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सभारंभ नुकताच पार पडला. यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष खामकर, पुणे वकील सोसायटीचे ॲड. सत्यजित तुपे, पुणे बार असोसिएशनचे ॲड. चेतन हरपळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गतवर्षीच्या कार्यकारणी सभासदांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विधिज्ञ प्रकाश खाडे, ॲड. दिलीप निरगुडे, ॲड. महेश बारटक्के, ॲड. प्रसाद किकले, ॲड. दशरथ घोरपडे, ॲड. कला फडतरे, ॲड. मानसी जगताप, ॲड. शिवाजी कोलते, ॲड. सुदाम सावंत, ॲड. पी. आर. झेंडे, ॲड. एस. आर. नाझीरकर, ॲड. रुपेश ताकवले, ॲड. विशाल पोमण, ॲड. नितीन जाधव, ॲड. धनंजय भोईटे आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. रोहन फडतरे यांनी केले. तर आभार ॲड. चंदन मेमाणे यांनी मानले.
अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. पिलाणे निवडीनंतर म्हणाले, ‘सर्वांना बरोबर घेऊन आपापसातील वादविवाद, हेवेदावे न ठेवता सर्वांनी सहकार्य करावे. सासवड बार सभासदांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्व सभासदांनी मतदानाच्या माध्यमातून विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार’.