Sassoon Hospital | पुणे : राज्यातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संपावर केली आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारी सेवा कोलमडले आहेत.यामध्ये आरोग्य सेवेवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.राज्यभरातून पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये ( Sassoon Hospital) उपचारासाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र ससून रुग्णालयातील कर्मचारी संपावर गेले असल्याने ससून रुग्ण्यालयाचे डीन यांनाच स्वतःच शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती समोर आली आहे.
कालच्या दिवसात छोट्या ३९ तर मोठ्या १३ शस्त्रक्रिया…!
ससून हॉस्पिटल मध्ये ९९ टक्के नर्सेस संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता डीन डॉ. संजीव ठाकूर स्वतःच शस्त्रक्रिया करत आहेत. कालच्या दिवसात छोट्या ३९ तर मोठ्या १३ शस्त्रक्रिया ससून हॉस्पिटल मध्ये पार पडल्या.
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज ही शासनातील कर्मचारी संपावर आहेत. सरकारी विभागांचे शेकडो अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा देखील संपात सहभागी आहेत.
संपावर गेलेल्यांची आज संध्याकाळ पर्यंत वाट पाहिले जाणार आहे. नर्सेस पुन्हा कामावर रुजू झाल्या नाहीत तर ७०० नर्सेस तात्पुरत्या सेवेसाठी बाहेरून मागवणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे ३२ विभागांचे अधिकारी-कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहेत. त्याचा फटका राज्यभरातल्या शासकीय सेवांना बसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश
Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर