उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणेश निवृत्ती टिळेकर यांची शुक्रवारी (ता. 11) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष (बापू) लोणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे अष्टापूरच्या मंडल अधिकारी गीतांजली काळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
सरपंच पदासाठी गणेश टिळेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने मंडल अधिकारी काळे यांनी सरपंचपदी गणेश टिळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. गणेश टिळेकर यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. ग्रामसेविका सुवर्णा शिवरकर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, मावळते सरपंच सुभाष बापू लोणकर, विकास टिळेकर सुभाष लाला टिळेकर, उपसरपंच सुषमा टिळेकर, शेतकी अधिकारी सदाशिवराव टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, सोसायटीचे अध्यक्ष अक्षय टिळेकर, संतोष टिळेकर, राजेंद्र बाळू टिळेकर, माजी उपसरपंच सुभाष टिळेकर, बाळासाहेब टिळेकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष आबासाहेब टिळेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सतीश टिळेकर, रोहन कांबळे सदस्य गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, प्रियांका कांबळे, नंदा राऊत, कल्पना टिळेकर, वैशाली चौरे आदी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच गणेश टिळेकर म्हणाले, टिळेकरवाडी गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच टिळेकरवाडीसह परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तत्पर असणार आहे.