वाघोली : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुलगाव येथील सराईत गुंडाला दोन वर्षासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सौरव विलास शिंदे (वय-26 वर्ष रा. फुलगांव, ता. हवेली, जि. पुणे) असं तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड सौरव शिंदे याच्यावर लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी, चोरी, मारहाण करुन गंभीर दुखापत करणे, असे गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे गरजेचे होते.
त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याने सदर आरोपीच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4, पुणे शहर यांच्याकडे पाठविला होता. त्याचे अवलोकन करून पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी तडीपार आदेश क्रमांक 42/2024 म पो का कलम 56 अन्वये 7 सप्टेंबर2024 पासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू, शुभम सातव यांनी केली.