Pune Crime पुणे : दागिने घडविणाऱ्या कारागिरांनीच सराफाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सराफाने तब्बल दिलेले २२ लाख ८० हजारांचे सोने घेऊन कारागीर पसार झाले. (Pune Crime) या प्रकरणी सोने घेऊन पसार झालेल्या कारागिरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी एका सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवार पेठेतील सराफ बाजारात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील सराफ बाजारात सराफी व्यावसायिकाची पेढी आहे. सराफ व्यावसायिकाचा कारागिरांवर विश्वास होता. महिन्याभरापूर्वी सराफ व्यावसायिकाने कारागिरांना २२ लाख ८० हजार रुपयांचे सोने दिले होते. त्यानंतर कारागिरांनी सराफ व्यावसायिकाला दागिने घडवून दिले नाही. कारागीर पसार झाल्याचे लक्षात आल्यावर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :