लोणी काळभोर : संत निरंकारी मिशनकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लोणी काळभोर (ता. हवेली) येथील संत निरंकारी सत्संग भवनात रविवारी (दि.१७) करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या शिबिरात २०६ युनिट रक्त संकलित करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोणी काळभोर मुखी राहुल काळभोर पुणे सीटीचे क्षेत्रीय संचालक अवनीत तावरे, आव्हळवाडी सेक्टर संयोजक दत्तात्रय सातव, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅलीचे आयोजन लोणी काळभोर, मांजरी, आव्हाळवाडी परिसरात केले होते. या शिबिरात २०६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. रक्तदानासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले. तर हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ससूनचे समाजसेवा अधीक्षक शरद देसले, डॉ. श्रमीका सिंगल व त्यांच्या सहकाऱ्यांची बहुमूल्य योगदान दिले.
रक्तदान करत पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी
लोणी काळभोर येथील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात पोलिसांनी रक्तदान केले. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलिस हवालदार विजय जाधव, दिगंबर जगताप, विशाल बनकर यांनी रक्तदान करुन पोलिस कायदा व सुव्यवस्था राखताना दैनंदिन जीवनात सामाजिक बांधिलकी जोपासत असतात, हे आपल्या कृतीतून सिद्ध केल्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.