उरुळी कांचन : अष्टापुर (ता. हवेली) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 98.93 टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता. 27) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 94 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 93 विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम संकष्टी संभाजी कुंजीर 93.60 टक्के,
द्वितीय वैष्णवी संदीप शितोळे 92.60 टक्के,
तृतीय श्रावणी बाळासाहेब कोतवाल 85.40 टक्के,
चतुर्थ ऋतुजा रमेश वारे 83.40 टक्के, श्रावणी संतोष चंदनशिव 83.40
पाचवा रिया गणेश कोतवाल 82 टक्के,
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजयदादा कोलते, शाळा समिती अध्यक्ष श्रीहरीदादा कोतवाल, शाळा समिती सदस्य सुभाषआप्पा जगताप, मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, सरपंच अश्विनी कोतवाल, उपसरपंच गणेश कोतवाल सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.