उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयातील शिपाई संजय जगन्नाथ ननावरे (वय-54) यांचे शनिवारी (ता. 07) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, असा परिवार आहे.

संजय ननावरे हे मागील 27 वर्षापासून महात्मा गांधी विद्यालयातील किमान कौशल्य विभागात कार्यरत होते. मनमिळावू, शांत व सर्वांशी मिसळून राहणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आकस्मित निधनाने महात्मा गांधी सर्वोदय संघ व उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, त्यांच्यावर उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत आज शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








