Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 October 2026, 22:08

पुणे : बारामतीत पोटदुखीवर उपचारासाठी गेलेल्या एका महिलेने डॉक्टरवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी संबंधित नामांकित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी पीडित महिला पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात गेली होती. तिथे सलाईन लावल्यानंतर ते संपल्यावर डॉक्टरांनी तिला केबिनमध्ये बोलावले. यावेळी महिलेसोबत तिचा लहान मुलगाही होता. तपासणीनंतर डॉक्टरने तिला पाठीचे काही व्यायाम करण्यास सांगितले. व्यायाम सुरू असताना डॉक्टर वारंवार जवळ येत असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. तिने अंतर ठेवण्यास सांगितल्यानंतरही डॉक्टर पुन्हा जवळ आले आणि हात मागे ताणत असताना त्यांनी महिलेच्या कमरेला हात लावून ‘छातीत धडधड होत आहे का?’ अशी विचारणा केली. या गैरवर्तनामुळे घाबरलेली महिला औषधे घेऊन घरी परतली.

घरी आल्यावर घडलेल्या प्रकारामुळे महिलेला मोठा मानसिक त्रास झाला. पुढे दसऱ्याच्या दिवशी त्या डॉक्टरांनी तिला व्हॉट्सॲपवर शुभेच्छांचा संदेश पाठवला. त्यावेळी संधी साधून महिलेने त्यांना त्या दिवशीच्या वागणुकीबद्दल जाब विचारला. यावर डॉक्टरने आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि ‘पुन्हा असे घडणार नाही’ असा मेसेज पाठवला, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेले तिचे पती बारामतीत परतल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पतीसोबत जाऊन तिने शुक्रवारी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली. महिलेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; 564 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Saturday, 24 October 2026, 21:13

पंतप्रधान मोदींवर जादूटोण्याचा संशय? स्मशानभूमीजवळ शेंदूराचं रिंगण, 9 लिंबू अन् 4 नारळ; फोटो सापडल्याने खळबळ!

Saturday, 24 October 2026, 20:37

लाडक्या बहिणींनो, ₹1500 चा बंद हप्ता WhatsApp वरून सुरू होणार? शासनाने दिलं स्पष्टीकरण…

Saturday, 24 October 2026, 20:14

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोपूजन सोहळा उत्साहात

Saturday, 24 October 2026, 19:38
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp