Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील व्यापाऱ्याला 25 लाखांचा गंडा! 1 किलो 400 ग्रॅमचा नकली हार माथी मारून दोघे पसार

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 November 2026, 12:41

बारामती : खोदकाम करताना सोन्याच्या वस्तू सापडल्याची बतावणी करून, खऱ्या सोन्याचा मणी दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर तब्बल 25 लाख रुपये घेऊन बनावट सोन्याचा हार देत बारामतीतील एका ऑटोमोबाईल व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजस्थानमधील दोघा भावांसह एका महिलेविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत उमेश अशोक दवे (वय 42, रा. बुरुड गल्ली, बारामती) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजुभाई प्रजापती, त्याची पत्नी आणि दिनेशभाई प्रजापती (तिघेही रा. मानपुरा, अबू रोड, राजस्थान) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दवे यांचे नेवसे रोड येथे श्रीकृष्ण ऑटोमोबाईल नावाचे दुचाकी स्पेअर पार्ट व दुरुस्तीचे दुकान आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुभाई प्रजापती नावाचा व्यक्ती हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकलच्या सर्व्हिसिंगसाठी दुकानात 26 सप्टेंबर रोजी आला होता.

त्यानंतर त्याने 29 सप्टेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन काही जुनी नाणी दाखवली. कोल्हापूर येथे जेसीबीने खोदकाम करताना ही नाणी आणि सोन्याच्या वस्तू सापडल्याचे त्याने सांगितले. आपल्याकडे आणखी 60 ते 70 नाणी आणि सोन्याच्या वस्तू असल्याचे सांगत त्या विकण्याची इच्छा व्यक्त केली. 30 सप्टेंबर रोजी त्याने मण्यांची माळ दाखवून त्यातील एक मणी दवे यांना दिला. दवे यांनी ओळखीच्या सोनाराकडून त्याची तपासणी केली असता तो खरा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी भिगवण रोडवरील एका दुकानाजवळ भेटून राजुभाईने सोन्याच्या वस्तूची किंमत 40 लाख रुपये सांगितली. तडजोडीनंतर 25 लाख रुपये रोख देण्याचे ठरले.

दवे यांनी स्वतःच्या बँक खात्यातून, पत्नीच्या खात्यातून तसेच दुकानाच्या गाळ्याच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून 25 लाख रुपये जमा केले. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी राजुभाई आणि त्याचा भाऊ दिनेशभाई प्रजापती हे दुकानात आले. त्यांनी मण्यांची माळ दाखवली. त्यातील एक मणी तपासणीसाठी घेतल्यानंतर सोनाराने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या फोटोवरून तो खरा असल्याचे सांगितले.

त्यानंतर मित्र रोहन हेन्द्रे यांच्या मध्यस्थीने 25 लाख रुपयांची रोख रक्कम आरोपींच्या ताब्यात देण्यात आली. त्या बदल्यात आरोपींनी मण्यांची माळ असलेली पिशवी दिली आणि तेथून निघून गेले. मात्र, काही वेळाने सोनाराकडून संपूर्ण माळेची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. हाराला पितळेचा मुलामा असून आतील भाग तांब्याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपींचे मोबाईल बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे दवे यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात राजुभाई प्रजापती, त्याची पत्नी आणि दिनेशभाई प्रजापती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीतील व्यापाऱ्याला 25 लाखांचा गंडा! 1 किलो 400 ग्रॅमचा नकली हार माथी मारून दोघे पसार

Thursday, 19 November 2026, 12:41

‘लग्न कर, नाहीतर आपले फोटो व्हायरल करेन’; धमकी दिल्यानंतर 18 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; सोलापुरात खळबळ

Thursday, 19 November 2026, 12:30

शिंगणापूरला जाण्यासाठी गाडी अन् पैसे न दिल्याने जावयाने सासऱ्यावर केला त्रिशूलने हल्ला

Thursday, 19 November 2026, 12:21

पुणे-नगर महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी, चालक गंभीर जखमी

Thursday, 19 November 2026, 11:32

पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू! ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले अन् काही वेळातच…

Thursday, 19 November 2026, 11:28

महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर सरकारचा मोठा निर्णय! बंद नळयोजना पुन्हा सुरू होणार; तातडीने आदेश जारी

Thursday, 19 November 2026, 11:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp