Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर सरकारचा मोठा निर्णय! बंद नळयोजना पुन्हा सुरू होणार; तातडीने आदेश जारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 November 2026, 11:12

पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी आणि टंचाईच्या काळात त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, आगामी महिन्यांत पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संकटावर वेळेत मात करण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या कामांना मंजुरी देण्याचे आर्थिक अधिकार आता थेट स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

या नव्या निर्णयानुसार, आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना 40 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या पाणीपुरवठा कामांना स्वतःच्या स्तरावर आर्थिक मान्यता देता येणार आहे. महसूलमंत्री तसेच दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील अधिकृत शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी पाणीपुरवठ्याच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवावे लागत होते, ज्यामध्ये प्रशासकीय प्रक्रियेमुळे बराच वेळ जात असे. यामुळे टंचाईग्रस्त गावांना वेळेवर मदत मिळण्यात अनेक अडथळे येत होते. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठीच सरकारने आर्थिक मर्यादा वाढवण्याचा हा पर्याय निवडला आहे.

सध्या ज्या भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे, तिथे युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बंद पडलेल्या नळपाणी योजनांची दुरुस्ती करून त्या पुन्हा कार्यान्वित करणे, गरजेनुसार नवीन तात्पुरत्या नळयोजना राबवणे आणि जिथे पाण्याचा स्रोत नाही तिथे टँकर किंवा बैलगाड्यांच्या मदतीने पाणी पोहोचवणे या कामांचा समावेश आहे. जिल्हा आणि विभाग पातळीवरच या कामांना तातडीने हिरवा कंदील मिळणार असल्याने, आता पाणीटंचाई निवारणाच्या कामांना मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर सरकारचा मोठा निर्णय! बंद नळयोजना पुन्हा सुरू होणार; तातडीने आदेश जारी

Thursday, 19 November 2026, 11:12

सांगवीच्या पोलीस पाटलांच्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 19 November 2026, 11:09

Loni Kalbhor News: तडीपार असूनही गावात बिनधास्त वावर; पोलिसांना पाहताच पळाला, पाठलाग करून गणेश विरकरला पकडले

Thursday, 19 November 2026, 11:01

कॉकरोच जनता पार्टीचा पुन्हा शाळांवर धडक मोर्चा! सातारा, कोल्हापूर, सांगलीत झाडाझडती मोहीम; सरकारचे टेन्शन वाढले..

Thursday, 19 November 2026, 10:49

बाळासाहेबांचा फोटो फाडला; शायना एनसींचा माफीनामा!

Thursday, 19 November 2026, 10:32

पुण्यातील 28.68 लाख नागरिकांसाठी मोठी संधी! मतदार यादीत नाव नसेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी करा नोंदणी; प्रशासनाचे आवाहन!

Thursday, 19 November 2026, 10:20
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp