वाघोली : माँ वैष्णोदेवीच्या पवित्र दर्शनासह शिवखोडी, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डरला भेट देण्याची संधी भाविकांना उपलब्ध होणार आहे. भक्त श्रावणबाळ देवदर्शन सेवा फाउंडेशनच्या वतीने 16 जानेवारीपासून सात रात्री आणि आठ दिवसांच्या भव्य धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी पुण्यातून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही प्रकारच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. प्रति व्यक्ती केवळ 9 हजार 999 रुपये इतके प्रवास शुल्क ठेवण्यात आले आहे. या यात्रेचे आयोजन वाघोलीचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल चाचा जाधवराव व मंजुनाथ स्वामी यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलेले आहे.

या यात्रेच्या पहिल्या दिवशी पुण्यातून रेल्वेने प्रस्थान होणार असून, मुंबई आणि दिल्लीमार्गे प्रवास करत तिसऱ्या दिवशी कटरा येथे आगमन होईल. त्यानंतर हॉटेलमध्ये भोजन करून भाविकांना माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना करण्यात येणार आहे. चौथ्या दिवशी विश्रांती आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी बसने शिवखोडी येथे जाऊन दर्शन घेण्यात येणार आहे.
सहाव्या दिवशी अमृतसर येथे आगमन झाल्यानंतर सुवर्ण मंदिर आणि ऐतिहासिक जालियनवाला बाग या स्थळांना भेट दिली जाणार आहे. तसेच वाघा बॉर्डर परिसरातील पर्यटनाचाही यात्रेत समावेश आहे. त्यानंतर रात्री पुण्याकडे रेल्वेने परतीचा प्रवास सुरू होणार असून, आठव्या दिवशी पुण्यात आगमन होईल.

यात्रेदरम्यान भाविकांना शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. हॉटेलमध्ये चार जणांच्या शेअरिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनुभवी टूर मॅनेजर आणि प्रत्येक रेल्वे डब्यात सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. ही यात्रा ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, यात्रेसाठी बुकिंग सुरू झाले असून, अधिक माहितीसाठी श्री. सुनील चाचा जाधवराव (9823407676) आणि श्री. मंजुनाथ स्वामी (9881234563) यांच्याशी संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता : कृष्णा कॉम्प्लेक्स, तळमजला, अष्टेकर ज्वेलर्सजवळ, पुणे-नगर रोड, वाघोली, पुणे. असा आहे. दर्शनाचे पुण्य तुमचे… सेवेचे पुण्य आमचे! या सेवाभावी भावनेतून भक्त श्रावणबाळ देवदर्शन सेवा फाउंडेशनने भाविकांसाठी या यात्रेचे आयोजन केले आहे.






