Sangola News| सांगोला : हमाली पासून ते शेती करून श्रावण सांगोलकर यांनी जिद्द व कष्टाने कुटुंबातील पाच पोलीस व एक एसटीमध्ये म्हणजे पाच मुली व एक मुलगा शासकीय सेवेत देऊन आदर्श निर्माण केला व महाराष्ट्रात प्रथमच एका घरातील शासकीय सेवेत मुली व मुले असे इतर कोठेही नाही त्यामुळे सांगोलकर कुटुंबाचा आदर्श बलवडी गावाने घ्यावा. या कुटुंबाने कष्टशिवाय यश प्राप्ती नाही हे दाखवून दिले आहे. (Porter of Sangola taluka made 5 boys policemen and one a conductor)
श्रावण सांगोलकर यांच्या कुटुंबाचे होतेय सर्वत्र कौतुक…
बलवडी ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने सांगोलकर कुटुंबाची यशोगाथा सर्वांना माहिती व्हावी म्हणून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. (Sangola News) सुरुवातीस माजी सरपंच बाळासो शिंदे यांनी कुटुंबाची यशोगाथा सांगितली तसेच आई-वडिलांचे कष्ट यामुळे संपूर्ण कुटुंब शासकीय सेवेत आले तसेच जावई पण शासकीय सेवेत आहेत यांचा आम्हास अभिमान आहे.
दरम्यान, हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा असून आई-वडील व गुरुजनांची साथ समाजाकडे लक्ष न देता वाटचाल केली त्यामुळे यश प्राप्ती झाली व यासाठी आई-वडील हेच आमचे प्रेरणास्थान आहे असे सत्कारमूर्ती नंदकुमार सांगोलकर व उमा, कांता, उज्वला, रेश्मा सांगोलकर यांनी सांगितले (Sangola News)
यावेळी माजी सरपंच प्रसाद शिंदे, डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, ऍड.सत्यजित लिगाडे, शिवसेना नेते साहेबराव शिंदे, सरपंच माऊली राऊत, उपसरपंच समाधान शिंदे, ग्राम सदस्य रविराज शिंदे, शिवाजी शिंदे बाबासो पालसांडे, विलास धायगुडे, शिक्षक नेते रमेश शिंदे माजी उपसरपंच विकास मोहिते, गणेश कमले, महादेव शिंदे, विलास बापू शिंदे, संदीप खुळपे सर्व ग्राम सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (Sangola News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना
Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात
Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या