लोणी काळभोर (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी देवतेच्या जन्म सोहळ्यानिमित्त तसेच श्रीमान महानसाधू श्री मोरया गोसावी व श्री चिंतामणी महाराज देव यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त संगीत श्री गणेश कथा व महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतातील पहिल्या गणेश कथाकार रुक्मिणीआई तारू महाराज व चिंतामणी तारू महाराज यांनी दिली.
मागील २० वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा सोहळा रविवारी (ता. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च) या कालावधीत श्रीक्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरात होणार आहे. श्री चिंतामणीची महापूजा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कलश पूजन रामदरा येथील हेमंतपुरी महाराज, विणापूजन पांडुरंग काळे, ग्रंथ पूजन मंदार महाराज देव (मुख्य विश्वस्त), जितेंद्र महाराज देव, केशव उमेश विध्वंस, राजेंद्र उमाप, सर्व ग्रामस्थ व श्री क्षेत्र थेऊर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सोहळ्यात रविवारी (ता. २५) सकाळी ६ ते ७ चिंतामणी विजय ग्रंथ पारायण दुपारी ११ ते ३ गणेश जप व राम जप दुपारी ४ ते ८ हरिपाठ सायंकाळी साडेसहा ते साडे आठ वाजता श्री गणेश कथा महात्म्य यामध्ये सर्व संतानी गणेशाला केलेले वंदन पंचदेव व ब्रम्हदेव सृष्टी निर्मिती कथेची माहिती. सोमवारी (ता. २६) शिवपार्वती व पार्वती मातेला गणेशाकडून पुत्रप्रप्तीचे वरदान, मंगळवारी (ता. २७) पार्वती मातेच्या माळातून गणेशाची उत्पती गणेशजन्म व बाळक्रीडा बुधवारी (ता. २८) अष्टविनायक ठिकाणी घडलेल्या भगवान गणेशाचे अवतार अवतार कार्य, गुरुवारी (ता. २९) दुर्वांकुर महात्म्य, विनायकी, संकष्टी, अंगारकी चतुर्थी महात्म्य, शुक्रवारी (ता. १) शमी मंदार महात्म्य व तुळशी भगवान गणेशाला का वाहायची नाही? शनिवारी (ता. २) शेंदूर उटी महात्म्य, कार्तिक स्वामी महात्म्य, भगवान गणेशांचा सिद्धी बुद्धीशी विवाह सोहळा रविवारी (ता. ३) काल्याचे कीर्तन सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.