(Salary) पुणे : कोतवाल हे पद शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच असून, शासकीय कामास बांधील आहे. त्यामुळे गावागावांत कार्यरत असलेल्या कोतवालांना एप्रिल महिन्यांपासून १५ हजार मानधन मिळणार असून त्याची कार्यवाही तात्काळ लागू होणार आहे. असा निर्णय शासनाने जारी केला आहे.
कोतवाल हे पद शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच…!
कोतवाल हे पद शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच असून, शासकीय कामास बांधील आहे. कोतवालांची कर्तव्ये व जबाबदार्या देखील शासनाने निश्चित केलेल्या आहेत. या सर्व बाबी विचारात घेता राज्यातील कोतवालांना मिळणारे मानधन हे तुटपुंज्या स्वरूपाचे आहे.
दरम्यान, राज्यात सुमारे प्रत्येक गावात १२ हजारांहून अधिक कोतवाल आहेत. या सर्व कोतवालांना १५ हजार रुपये मानधन महिन्याला मिळणार आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही वाढ लागू करण्यात आली आहे.