लोणी काळभोर (पुणे) : येथील विशे कॉम्पोनंट्स कंपनीच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन बळवंत काळभोर यांची शुक्रवारी (ता. १९) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी हेमंत बबन कादबाने व चक्रवती तुकाराम मुरकुटे यांची निवड झाली आहे. यावेळी संघटना कार्यकारणी मंडळ उपस्थित होते.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विशे कॉम्पोनंट्स कंपनीच्या कामगार संघटनेची 2024-26 ची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच कदमवाकवस्ती येथील एंजेल हायस्कूलमध्ये पार पडली. या निवडणुकीत कामगार विकास पॅनलने 11 – 2 च्या फरकाने बाजी मारली होती. कामगार संघर्ष पॅनलला अवघ्या 2 जागेवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान माजी अध्यक्ष सुजित काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विकास पॅनलची स्थापना करण्यात आली होती.
संघटना कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष – सचिन बळवंत काळभोर,
उपाध्याक्ष – हेमंत बबन कादबाने, चक्रवर्ती उर्फ शंकर तुकाराम मुरकुटे
सरचिटणीस – सचिन किसन चांदगुडे
चिटणीस – किशोर रघुनाथ तांबे
खजिनदार – सागर दगडूराम काळभोर,
अंतर्गत तपासणीस – योगेश बाजीराव देसाई,
प्रतिनिधी – सचिन भगवान काळभोर, सचिन दत्तात्रेय थोरात, दत्तात्रेय तानाजी डिंबळे, महेश हरिभाऊ सपकाळ, अमित वसंत कदम, चंद्रशेखर नारायण देशमुख