पुणे: अजित पवार यांनी ३० वर्षांत बारामती उभी केली. दादा-दादा करत यांच राजकीय आयुष्य व्यतीत झालं, असा टोला शुक्रवारी अजित पवार गटाचे नेते खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळेंना लगावला होता. यानंतर आता रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेतून त्यांनी थेट नाव न घेता सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?पाया भरला,…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात, त्यांनाच प्रश्न विचारतात…?, अशा शब्दांत रुपाली चाकणकरांनी खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणाचा हक्क याबाबत अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये वाद सुरू आहेत. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येत आहे.