RTE Admissions | पुणे : आरटीई ऑनलाइन ( RTE Admissions )प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी आज शुक्रवारी (ता.१७) रात्री बारापर्यंत करता येणार होता. मात्र, पालकांच्या मागणीवरून प्रशासनाने या मुदतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता पालकांना २५ मार्च पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.
अर्ज भरण्यास असंख्य अडचणींचा सामना…
आरटीई अर्जांची ऑनलाइन प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत परिपूर्ण अर्ज करावा, पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी दहा शाळांची निवड करावी, अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पालकांसाठी मदत केंद्राची स्थापना केली आहे. मात्र, सलग आरटीईचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पालकांना अर्ज भरण्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, १७२ शाळांमधील ४ हजार ३०० जागा आरटीईअंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. शुक्रवार १७ मार्च दुपारपर्यंत पालकांकडून फक्त १ हजार ६२२ अर्ज करण्यात आले.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रिया सुरू असून १७ मार्चला रात्री बारापर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, पालकांच्या मागणीस्तव प्रशासनाने २५ मार्च पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अर्ज करण्याची गती वाढतच असून सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन संकेतस्थळ बंद पडत आहे. वारंवार सर्व्हर हँग होत आहे. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime News | पुणे : क्रेडीट कार्डचे पिन जनरेट करण्यास सांगून लुबाडले तब्बल साडेसात लाख
Old Pension | जुन्या पेन्शन आंदोलकांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा