पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी आज रुट मार्च काढण्यात आला.
यामध्ये येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या लक्ष्मी नगर चौकीमधील भगवा झेंडा चौक, राज चौक, चित्रा चौक, भगतसिंग चौक अशा संवेदनशील भागातून, तसेच जेल रोड चौकीमधील नागपूर चाळ, स्वराज्य मित्र मंडळ, लुंबिनी गार्डन या भागामधून रूट मार्च काढण्यात आला.
यावेळी सदर रुट मार्चमध्ये परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, बीएसएफ 30 बटालियनचे डेप्युटी कमांडंट मनोज कुमार, असिस्टंट कमांडंट नीरज पांडे, इन्स्पेक्टर अमन कुमार तसेच 2 अधिका-यासह 50 कर्मचारी, परिमंडळ 4 चे RCP मोबाईल यावरील 1 अधिकारी, 8 अंमलदार आणि येरवडा पोलीस स्टेशनचे 2 अधिका-यासह 15 अंमलदार यांचा या रुट मार्चमध्ये सहभाग होता.