मुंबई : Rohit Pawar- एका युट्यूब चॅनेलला आमदार रोहित पवारांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. सध्या त्यांची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. ‘राजकीय जीवनात नागरिकांशी संवाद साधताना असा एखादा प्रसंग घडला आहे का, ज्यामुळे तुम्हालाच हसू आलं?’ असा प्रश्न रोहित पवारांना (Rohit Pawar) मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक किस्सा शेअर केला.
रोहित पवार म्हणाले की,
मला कधी कधी फोन येतात की एक मुलगी आवडते, पण तिला कोणीतरी दुसरं आवडतं. मला का सांगतोय, असं विचारल्यावर ती मुलगी तुम्हाला फॉलो करते असं सांगतात. तुम्ही तिला सांगितल्यावर ती कदाचित तिचं मन बदलेल. अशीही काम आमच्याकडे येतात, पण ही काम मी करत नाही. असे फोन आल्यानंतर मी मनसोक्त हसून घेतो.’
रोहित पवारांच्या या उत्तरावर ‘आवडली की सांगा आम्ही उचलून आणू, असं तुम्ही म्हणता का’ असा मुलाखतकाराने प्रतिप्रश्न केला. त्यावर रोहित पवार म्हणाले, ‘काही लोक असतात जे जोशमध्ये बोलून जातात. मुंबईतील एक आमदार असं म्हणालेले, आम्हाला कळलं.’
रोहित पवार यांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चा सुरू असते. रोहित पवार हे अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावरही त्यांना फॉलो करणारा वर्ग मोठा आहे.राजकारणाशिवाय इतरही विषयांवर ते बोलत असतात
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल – अँड शरद जामदार
Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल – अँड शरद जामदार