Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कंत्राटी शिक्षक नियुक्तीमध्ये बदल; सेवानिवृत्त शिक्षकांना वगळून बेरोजगारांना संधी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 September 2024, 20:20
Retired teachers excluded from contractual teacher recruitment in maharashtra

संतोष पवार
पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक, डी.एड., बी.एड. पात्रताधारकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयावर राज्यभरातून टीका झाल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन शासन निर्णयानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांऐवजी आता दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर केवळ डीएड आणि बीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची एक वर्षाच्या करार पद्धतीने कंत्राटी नियुक्ती करण्यात येणार आहे. तर सेवानिवृत्त शिक्षकांना यामधून वगळण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक, तर एक शिक्षक डीएड, बीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला होता. या निर्णयाला शिक्षण संघटना आणि शिक्षक भरतीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने या निर्णयात बदल केला. तसेच पाच सप्टेंबर रोजीचा निर्णय रद्द केला आहे. नव्या निर्णयानुसार, वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांऐवजी आता दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर केवळ डीएड आणि बीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना वगळण्यात आले आहे.

सुरुवातीला एका वर्षासाठी ही नियुक्ती करून गुणवत्ता आणि योग्यतेच्या आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नूतनीकरण करता येईल. त्यासाठी दरमहा १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. यामध्ये अन्य कोणतेही लाभ लागू नसतील. या नियुक्तीसाठी कमाल आणि किमान वयोमर्यादा लागू असेल. नियुक्त कंत्राटी शिक्षकांना एकूण बारा रजा मिळतील. ही नियुक्ती करार पद्धतीची असल्याने संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सामावून घेण्याचे, नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करावा लागणार आहे. अध्यापनाचे तास नियमित शिक्षकांप्रमाणे असतील. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र उमेदवारांतून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देण्याबाबत सांगण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाह केला म्हणून माहेरने तोडले नाते! मृत्यूनंतरही स्वीकारला नाही मृतदेह; नेमकं प्रकरण काय? वाचा

Tuesday, 17 November 2026, 13:11

Daund News : सोनवडीत आईच्या विनयभंगाचा राग मनात धरून तरुणाचा खून, धारदार शस्त्राने डोक्यावर वार, दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 13:08

CJP च्या राजकारणात ट्विस्ट! पक्षबांधणीनंतर ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा; नेमका काय आहे मास्टरप्लॅन?

Tuesday, 17 November 2026, 12:56

पुणे रिंगरोडच्या नामांतरावरून राजकारण तापलं! रोहित पवारांचा सरकारला सवाल; अजितदादांचं नाव देणार की नाही?

Tuesday, 17 November 2026, 12:40

शिरूर ग्रामीण येथे अडीच वर्षांच्या ग्रामपंचायत सदस्य पद वाटपाचा वाद चिघळला! दोन गटात कोयते, रॉड आणि दांडक्यांनी हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादीवरून 11 जणांवर गुन्हा..

Tuesday, 17 November 2026, 12:28

शेतकऱ्यांच्या संस्थेच्या भूखंडावर खासगी विकसकाचा डोळा? हवेली खरेदी-विक्री संघाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी!

Tuesday, 17 November 2026, 12:19
Next Post
woman died as husband and her friend attacked on her in nashik

पती एका महिलेसोबत राहत असल्याची मिळाली माहिती; पत्नी 'त्या' ठिकाणी येताच दोघे आढळले एकत्र, त्यानंतर नवरा आणि त्याच्या प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत गमावले प्राण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp