Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

क्रूरतेचा कळस..! जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने श्वानाला रस्त्यावर आपटून आपटून मारले; वडकी हद्दीतील घटना, पहा व्हिडीओ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 24 June 2024, 16:59

लोणी काळभोर, (पुणे) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने घरासमोर आलेल्या एका १८ महिन्यांच्या पामोलीव्ह जातीच्या श्वानाला रस्त्यावर आपटून आपटून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण इंद्रजित घुगे ( वय – ३१, रा. गायधरा, वडकी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ज्योती धनराज पाटील (वय 36, रा. अविसा पार्क सोसायटी, गायधरा वडकी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील या कुटुंबीयांसोबत वडकी परिसरात राहतात. तर अरुण घुगे हे त्यांच्या शेजारी राहतात. पाटील यांच्याकडे पामोलीव्ह जातीचे पांढऱ्या रंगाचे तीन पाळीव श्वान आहेत. त्यापैकी 01 मादी व 02 नर आहेत. यापूर्वी शेजारी राहणाऱ्या अरुण घुगे याच्या अंगावर पाळीव श्वान धावून जाण्याच्या कारणावरुन वाद झालेला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळ सुटले होते. त्यामुळे राहत्या घरावरील पत्रे वाऱ्याने हलत असल्याने पाटील यांचा मुलगा यश घरावरील पत्र्यावर दगड ठेवण्यासाठी पत्र्यावर चढला होता. तेव्हा पाटील व त्यांची मुलगी त्याला मदत करीत होते. यावेळी घरासमोरील गेट वाऱ्यामुळे उघडल्याने घरातील दोन पाळीव श्वान बाहेर पळाले. दोन्ही श्वान शेजारी राहणाऱ्या अरुण घुगे याच्या घराकडे धावत गेले. यावेळी घुगे हा घरासमोर बसला होता.

श्वान घरासमोर आले असता अरुण घुगे याने सदर दोन श्वानांपैकी पामोलीव्ह जातीच्या श्वानास (वय 18 महीने) पकडून त्याला रस्त्यावर दोन ते तीन वेळेस जोरात आपटले. यावेळी पाटील व त्यांचे कुटुंबीय श्वानाजवळ गेले असता श्वान निपचित पडल्याचे दिसले. यावेळी पाटील यांनी अरुण घुगे यास मुक्या प्राण्यांना का मारले असे विचारले असता, त्याने तुझी कुत्री नीट सांभळता येत नाहीत का? असे म्हणत तुला काय करायचे ते कर, पुन्हा माझ्या दारात तुझे कुत्रे आले तर, तुला पण असेच आपटून मारेन, अशी धमकी देत शिवीगाळ केली.

दरम्यान, श्वान जखमी झाल्याने त्याला तात्काळ उपचारकामी पशु वैद्यकीय दवाखाना, श्रेणी-2, उरुळी देवाची येथे नेण्यात आले. सदर ठिकाणी असणाऱ्या पशु वैद्यकीय अधिकारी यांनी श्वानास तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अरुण इंद्रजित घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात टोळक्याला हटकणं पडलं महागात! सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन गेला; टोळक्यासोबत बाचाबाची अन् तरुणासोबत घडलं भयंकर

Monday, 7 September 2026, 16:45

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल! दहीहंडीतील लावणी कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह आयोजकांवर कारवाई

Monday, 7 September 2026, 15:55

पिंपरी सांडस येथे भीमा नदीच्या 25 फूट उंच पुलावरून महिलेची उडी; धानोरे येथील शेतकरी तरुणामुळे टळला मोठा अनर्थ..

Monday, 7 September 2026, 15:48

नवविवाहितेचा खून! मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् शरीराचे केले तुकडे; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 7 September 2026, 15:41

गडकरींच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ! सुशिक्षित मतदारांपेक्षा क्रिमिनल अन् अंडरवर्ल्ड भागातून मिळाली तब्बल 92% मतं

Monday, 7 September 2026, 15:24

बारामतीमध्ये पुन्हा रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना? सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एन्ट्री

Monday, 7 September 2026, 15:21
Next Post

धक्कादायक...! शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मांडवगण फराटा येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp