Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Dhangekar: ‘या’ प्रकरणात रवींद्र धंगेकर अडकणार? क्रिमिनल केस अन् दिवाणी दावा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 October 2025, 18:24
Ravindra Dhangekar: Will Ravindra Dhangekar be involved in 'this' case? Criminal case and civil suit filed

Photo- Social Media

पुणे: पुण्यातील तापलेल्या (Ravindra Dhangekar) राजकीय वातावरणात (Pune News) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय व्यावसायिक समीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध क्रिमिनल मानहानीचा खटला आणि दिवाणी दावा दाखल केला असून, या प्रकरणामुळे धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का बसू शकतो.

धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहयोगी समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका केली होती. निलेश घायवळ या कुख्यात गुंडाशी संबंधित प्रकरणात धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता. या आरोपांसाठी त्यांनी काही फोटो आणि माहिती दिली होती. मात्र, त्या पुराव्यांचा कोणताही ठोस आधार नसल्याचा दावा समीर पाटील यांनी केला आहे.

समीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “धंगेकर यांच्या निराधार वक्तव्यांमुळे माझ्या प्रतिमेला आणि व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. राजकीय लाभासाठी माझी प्रतिष्ठा घालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करीन आणि धंगेकर यांना जबाबदार धरले जाईल. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत किंवा 50 कोटी रुपये भरत नाहीत, तोपर्यंत मी माघार घेणार नाही.”

या पार्श्वभूमीवर समीर पाटील यांनी 14 ऑक्टोबर रोजी धंगेकर यांना 50 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. आता त्यांनी या प्रकरणात पुणे जिल्हा न्यायालयात क्रिमिनल आणि दिवाणी दोन्ही खटले दाखल केले आहेत.

 

दरम्यान, महायुतीत असूनही रवींद्र धंगेकर हे मित्रपक्षांवर सातत्याने टीका करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांना “दंगे बंद करा” अशा सूचना दिल्यानंतरही त्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीतील संबंध ताणले जाऊ शकतात, आणि पक्षांतर्गत कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

या घडामोडींचा आगामी महापालिका निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असून, धंगेकर यांना आता राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही लढाया एकाचवेळी लढाव्या लागणार आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24

सुपारी ठरली कारण! FDAच्या ५ बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन; धाड टाकणं पडलं महागात

Monday, 19 October 2026, 15:14

देव तारी त्याला कोण मारी! लेकीसह तिनं दरीत उडी मारली, झाडाच्या फांद्यांना दोघी अडकल्या; पोलीस धावले अन् लोणावळ्यात बचावकार्याचा थरार..

Monday, 19 October 2026, 15:11

एक क्लीक अन् तिनं गमावली आयुष्यभराची कमाई! पुण्यात महिलेनंच महिलेला फसवलं; सोशल मीडियावर ओळख अन् नंतर गोड बोलून…

Monday, 19 October 2026, 15:07

टायगर श्रॉफनंतर जितेंद्र आव्हाड निशाण्यावर? ‘आधी जित्याला गोळ्या घालेन, मग तुला पाहतो’, असे म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी

Monday, 19 October 2026, 14:58

पुण्यात भाडेकरूचं घरमालकिणीसोबत भयानक कृत्य! ‘घर नावावर कर’ म्हणत १५-२० पंटर मित्रांना बोलावलं अन् नंतर असं काही केलं की ….

Monday, 19 October 2026, 14:50
Next Post

Pune News: ऐन दिवाळीत कांद्याने केला वांदा! शेतकऱ्यांची दिवाळी कडूच....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp