शेरखान शेख
Ranjangaon News : रांजणगाव गणपती, (पुणे) : पालकांसोबत शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बाजारात हरविलेली बालिका एका तासाच्या आत तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना सोशल मिडियामुळे यश आले असून बालिका तिच्या आईच्या कुशीत विसावली आहे.
सोशल मीडियामुळे पालकांचा शोध घेण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नगर महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी एक लहान बालिका उभी राहिल्याने वाहने थांबल्याचे येथील फिटर अनंत गायकवाड याला दिसून आले त्याने तातडीने सदर बालिकेला उचलून घेत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले.
पोलीस हवालदार मंगेश लांडगे यांनी तातडीने सदर बालिकेचे फोटो काढून नागरिकांच्या मदतीने सोशल मिडीयावर प्रसारित केले. (Ranjangaon News) तर पोलीस शिपाई किशोर शिवणकर, महिला पोलीस अंकिता पाटोळे, ग्रामपंचायत कर्मचारी सिकंदर शेख यांनी शिक्रापूर परिसरात बालिकेच्या आई वडिलांचा शोध घेतला असताना एका तासाने पोलीस स्टेशन मध्ये एका दाम्पत्याची मुलगी हरवली असल्याबाबत फोन आला.
पोलिसांना त्यांना घडलेला प्रकार सांगत पोलीस स्टेशनमध्ये येण्याची विनंती केली. (Ranjangaon News) काही वेळात मुलीचे समसुद्दीन खान व आई रिजवाना खान हे दोघे पोलीस स्टेशन आले असता आपल्या आर्शी या मुलीला सुखरुप पाहून तिच्या आईचे डोळे भरुन आले.
यावेळी पोलीस हवलदार मंगेश लांडगे, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, महिला पोलीस अंकिता पाटोळे, अनंत गायकवाड, सिकंदर शेख, निशा वानखेडे यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी आम्ही दुकानात असताना मुलगी नजरचुकीने बाहेर गेल्याचे सांगत आपल्या मुलीला सुखरूप पाहून बालिकेच्या आई वडिलांनी पोलिसांसह नागरिकांचे आभार मानले.
सोशल मिडीयाचा चांगल्या कामासाठी वापर करा..
सोशल मिडीया जीवनातील एक घटक झालेला असून त्याचा वापर योग्य कारणासाठी करणे गरजेचे असल्याचे सांगत सोशल मिडीयाचा मर्यादित व चांगल्या कामासाठी वापर करण्याचे आवाहन यावेळी पोलीस हवलदार मंगेश लांडगे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत सेवाधाम विद्यालयाचे यश
Ranjangaon News : लाल बहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्याची शास्त्रीजींना अनोखी आदरांजली