युनूस तांबोळी
Ranjangaon News : रांजणगाव गणपती : राज्यात फक्त शिक्षकांना शाळा बाह्य कामे देऊन अन्याय केला जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान कधी करायचे हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यासाठी अशैक्षणिक ऑनलाईन कामे बंद करून फक्त विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचे काम करू द्या. त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होईल. असे न झाल्यास राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी (ता. २ ऑक्टोबर) राज्यातील सर्व जिल्हा परिषदेवर आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना च्या वतीने करण्यात आला आहे.
रांजणगाव येथे झाली राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेची बैठक
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान महामोर्चाचे आयोजन करण्याचे ठरले. (Ranjangaon News) यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष उत्तमराव भंडारे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष बापू लांडगे,राज्य प्रतोद बाळासाहेब घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष गावडे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष बबन माहळसकर, संचालक संतोष थोपटे, राहुल घोडे, कैलास गारगोटे, सुनील शेळके, प्रभाकर शेळके, शरद झेंडे, हिरामण ढोकले. आबासाहेब जाधव, रमेश उबाळे, राजाराम सकट, लहू गाजरे , (Ranjangaon News) लहू शितोळे, महिला अध्यक्ष नयना अरगडे, जयमाला मिडगुले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस आप्पासाहेब रसाळ यांनी केले. संतोष शेवाळे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : “पी एम स्किल रन”ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.