Ranjangaon News : रांजणगाव गणपती : शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांना दुचाकी, चारचाकी वाहने चालविण्यास देऊ नयेत. वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. वाहतूक सिग्नलचे नियम पाळावेत व अपघात टाळावेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी केले.
महागणपती ग्रूप ऑफ स्कूलच्या वतीने वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता शिबिर
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे महागणपती ग्रूप ऑफ स्कूलच्या वतीने बुधवारी (ता. १८) वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (Ranjangaon News) त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, दिवसेंदिवस वाढणारे अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे. वाहन चालवताना पाळायचे नियम, हेल्मेटचा वापर, सिग्नल यासंबंधीचे नियम या सर्व नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे.
याप्रसंगी महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास शेळके, प्राचार्य अरविंद गोळे, पर्यवेक्षक निलेश फापाळे, (Ranjangaon News) प्राचार्या अबेदा आतार, वंदना खेडकर, पद्मिनी कवठेकर, विभाग प्रमुख सोनाली नलावडे, स्मिता गोळे, नरसाळे, यादगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गोळे यांनी केले. अरविंद गोळे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : बिबट्याशी संघर्ष न करता जीवनाचा भाग बनवणे – प्रताप जगताप..
Ranjangaon News : शिक्रापुरात हरवलेली बालिका सोशल मिडियामुळे पालकांच्या स्वाधीन..