Raju Shetti | पुणे – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुसकसाने झाले आहे. मदतीच्या आपेक्षेने शेतकरी सरकारकडे डोळे लावून बसला आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी खडे बोल सुनावले आहेत.
शेट्टी म्हणाले की, ” शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेला त्या प्रभू रामचंद्राने प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले म्हणून जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे ” राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कांदा द्राक्ष, भोपळा, भाजीपाला, पेरु यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो…
तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ” तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल. तर अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.तर शेती नुकसानीचे प्राथमिक अंदाज आमच्याकडे आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
शेतकऱ्याची विवशता आणि अफूची शेती ; राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर