Rajgurunagar News : राजगुरूनगर : आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या साहित्याचे बिल काढण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना राजगुरुनगर नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, आरोग्य विभागाच्या अभियंता आणि लेखापाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या लाच प्रकरणातील मुख्य अधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लालगे यांना खेड राजगुरुनगर न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतची माहिती आरोपीचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली.
घटना घडताना आरोपी कार्यालयातच नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद
या प्रकरणी युक्तिवाद करताना आरोपीचे वकील अॅड. प्रताप परदेशी यांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रारदार हा व्यापारी असून, तो आरोपीच्या कार्यालयाला नियमानुसार व शासन निविदेनुसार स्टेशनरी पुरवतो. तक्रारदाराने कायद्यानुसार आणि निविदेनुसार काही स्टेशनरी आरोपीच्या कार्यालयाला पुरवली होती. त्यामुळे या साहित्यासाठी आरोपीच्या कार्यालयात देय बिल प्रलंबित होते. (Rajgurunagar News ) तक्रारदाराने सहआरोपी आणि आरोपी यांच्याकडे आपले प्रलंबित बिल वितरित करण्याची वारंवार विनंती केली. आरोपी कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम करत असल्याने प्रलंबित बिले वितरित करण्यासाठी त्यांची मंजूरी आवश्यक होती.
दरम्यान, तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार, त्यांची प्रलंबित बिले वितरीत करण्याची विनंती करूनही आरोपी आणि सहआरोपींनी बिल देण्यास टाळले. त्यानंतर आरोपीच्या संगनमताने सहआरोपींनी प्रलंबित बिल देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच मागितली. (Rajgurunagar News ) सहआरोपीमार्फत लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने लोलगे आणि त्याच्या सहकारी कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, सापळा रचण्यात आला तेव्हा आरोपी कार्यालयात उपस्थित नव्हता. सहआरोपीने लाचेच्या रकमेची मागणी करुन स्वीकारली. रक्कम स्विकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम आधीच वसूल करण्यात आली असून, सहआरोपी व लोलगे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. (Rajgurunagar News ) आरोपी सध्या जामिनावर आहेत, असा युक्तिवाद अॅड. प्रताप परदेशी यांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Rajgurunagar News : व्यक्ती-व्यक्तींमधील उत्तम संवादाची नितांत गरज : प्रा. मुबीन तांबोळी