(Railway News) पुणे : पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या प्रवास्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता येत्या १७ एप्रिलपासून पुणे-अमरावती विशेष रेल्वेगाडी सुरु होणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रसासनाकडून देण्यात आली आहे.
१८ एप्रिलपासून धावणार…!
पुण्याहून अमरावतीकच्या दिशेने ०१४५२ क्रमांकाची विशेष एक्स्प्रेस पुण्याहून येत्या १७ एप्रिल रोजी रवाना होणार आहे. तर ०१४५१ क्रमांकाची अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस १८ एप्रिलपासून धावणार आहे. या साप्ताहिक रेल्वेगाडीमुळे उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येत्या १३ एप्रिलपासून या रेल्वेगाडीचे बुकिंग खुले होणार आहे. २७ जूनपर्यंत या विशेष एक्स्प्रेस उपलब्ध आहेत.
मध्य रेल्वेने आता विशेष रेल्वेगाडी सुरू केली असली, तरी साप्ताहिक आहे. ०१४५२ क्रमाकांची पुणे-अमरावती एक्स्प्रेस १७ एप्रिलपासून दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ०७.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी ११.०० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहचेल.
तर परत ०१४५१ अमरावती-पुणे एक्स्प्रेस १८ एप्रिलपासून दर मंगळवारी अमरावतीहून सायंकाळी ०५.५५ वाजता सुटेल आणि बुधवारी ०६.३० वाजता पुणे स्थानकावर पोहचेल. या रेल्वेगाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर हे थांबे देण्यात आले आहेत.