Railway | पुणे : मध्य रेल्वेने मालवाहतुक सेवा वाढवण्यावर भर दिला आहे. याचे फलित म्हणून मध्य रेल्वेने तब्बल मालवाहतुकीतून तब्बल रेल्वेला ७७१.५० कोटी रुपयांचे उत्पन्नाची कमाई केली आहे. अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.
मालवाहतुकीत एप्रिल महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.९१ टक्के वाढ नोंदवली आहे. एप्रिलमध्ये ७४.२ लाख टन मालवाहतूक करण्यात आली. त्यातून गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मध्य रेल्वेची मालवाहतूक ७१.४ लाख टन होती. त्यातून ७१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा एप्रिलमध्ये उत्पन्नात ७.९ टक्के वाढ होऊन ते ७७१.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सिमेंट आणि क्लिंकरची (सिमेंटचे उपउत्पादन) वाहतूक एप्रिलमध्ये २४३ रेक (इंजिन वगळता मालगाडी) झाली. गेल्या वर्षी ती १७८ रेक होती.
रेल्वेतून वाहनांची वाहतूक गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ६६ रेक होती. यंदा एप्रिलध्ये ती वाढून ९५ रेकवर पोहोचली आहे. कंटेनरची वाहतूकही ९.९ टक्क्यांनी वाढून ६५७ रेकवरून ७२२ रेकवर पोहोचली आहे. पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूकही १८२ वरून २०१ रेकवर पोहोचली आहे. खतांची वाहतूक वाढून ५७ वरून ९० रेक झाली आहे.
लोह आणि पोलादाची वाहतूक मागील वर्षी एप्रिल महिन्यात ९३ रेक होती. यंदा एप्रिलमध्ये ती १५९ रेकवर गेली आहे. लोहखनिजाची वाहतूकही ४४ वरून ७३ रेकवर पोहोचली आहे. रेल्वेच्या प्रतिकिलोमीटर प्रतिटन मालवाहतुक क्षमतेत एप्रिलमध्ये ३.२१ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Superfast Train |पुणे आणि कानपूर सेंट्रल दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष सुपरफास्ट रेल्वे सुरु