लोणी काळभोर, (पुणे) : मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईटजवळ ओढ्यालगत गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना ऋषीकेश ताकवणे व रमेश मेमाणे यांना मांजरी खुर्द गावचे हद्दीत गोदरेज बांधकाम साईटजवळ ओढ्यालगत गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बुधवारी (ता. 13) सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी 15 हजार लीटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन (नवसागर, तुरटी व गूळ मिश्रित ) व इतर साहित्य, 35 लीटर तयार दारू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक युनिट 6 चे वाहीद पठाण, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली