पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रसचे नेते राहुल गांधी यांना शिवाजीनगर न्यायालायात सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता.