Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar News: भरदिवसा घरावर दरोडा, पोलीस अन् ग्रामस्थांचा सिनेस्टाईल पाठलाग, ड्रोनचा वापर; पुरंदर तालुक्यात काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 September 2025, 21:59
Purandar News

पुणे: पुरंदर तालुक्यातील (Purandar News) दौंडज गावात शनिवारी दुपारी अक्षरशः चित्रपटाला साजेशी घटना घडली. भरदिवसा घरफोडी करून पळ काढणाऱ्या तिघा चोरांचा ग्रामस्थ व पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बंदोबस्त केला. या कारवाईत उसाच्या शेतात लपलेल्या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला आणि त्यांना अखेर जेरबंद करण्यात आले.

दुपारी दौंडज गावातील एका वस्तीवर तीन चोरांनी दरोडा टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. नीरा येथील थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची गाडी अडकली आणि ग्रामस्थांनी त्यांना गाठले. त्यावेळी चोरांनी पाठलाग करणाऱ्या तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवत दोन जण पसार झाले. मात्र वाहनचालकाला पकडण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे व पीएसआय सर्जेराव पुजारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पसार झालेले चोर पुणे–पंढरपूर मार्गावरील जेऊरजवळील उसाच्या शेतात लपले होते. दाट उसामुळे शोधमोहीम अवघड ठरत होती. त्यामुळे सुमारे 150 ते 200 स्थानिक तरुणांनी शेताला वेढा घातला. पोलिसांनी तरुणांना थेट शेतात न शिरता फक्त परिसरात पहारा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर ड्रोन उडवून शेतातील सर्वेक्षण करण्यात आले. ड्रोनच्या कॅमेऱ्यात चोरांचा ठावठिकाणा लागताच पोलिस व ग्रामस्थांनी संयुक्त कारवाई करून त्यांना पकडले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय 35), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय 30) आणि रत्नेश राजकुमार पुरी (वय 23) अशी आहेत. हे तिघेही संभाजीनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. त्यांच्याकडून पुढील तपास सुरू असून, उर्वरित दोन साथीदारांविरुद्ध शोधमोहीम सुरू आहे.

 

या कारवाईत पोलिसांसोबत संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर आदींनी सक्रिय सहभाग घेतला. प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी सांगितले की, “स्थानिक तरुणांनी पोलिसांना चांगले सहकार्य केल्यामुळे चोरांचा बंदोबस्त करणे शक्य झाले. अशा प्रकारे लोकांचा पाठिंबा मिळाला, तर चोरीच्या घटनांवर आळा घालणे सोपे जाईल.”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post
Bacchu Kadu On Devendra Fadnavis: 'Half the ministers are bosses, but Devendra Fadnavis is the big boss' Bacchu Kadu's attack, criticism of Modi too...

Bacchu Kadu On Devendra Fadnavis: 'अर्धे मंत्री आका तर देवेंद्र फडणवीस हे मोठे आका' बच्चू कडूंचा हल्लाबोल, मोदींवरही टीका...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp