Punit Balan News : पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक पुनित बालन यांना पुणे महापालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिग्ज लावल्याबद्दल ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बालन यांनी पुण्यातील गणेश मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्या दिल्याने गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात पुनित बालन आणि त्यांच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डचे संपूर्ण शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते.
तब्बल ३ कोटी २० लाखांचा दंड..
पुनित बालन यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात झळकणाऱ्या फोटोंची पुण्यातील गणेशोत्सवात चर्चा होती. मात्र याच फ्लेक्स आणि फोटोंना अनधिकृत ठरवून महापालिकेने त्यांना तीन कोटी वीस लाखांचा दंड ठोठावला आहे. (Punit Balan News ) आपण परदेशात असून पुणे महापालिकेने पाठवलेल्या नोटिशीबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे पुनित बालन यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून पुनित बालन पुण्यातील विविध दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करतात. या बदल्यात या मंडळांनी त्यांच्या भागात बालनच्या ऑक्सिरिच पाण्याच्या बाटल्यांचे ब्रँडिंग करण्यास परवानगी दिली आहे. (Punit Balan News ) पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. शहरभर लावण्यात आलेले हे फ्लेक्स अनेकदा चर्चेचा आणि गमतीचा विषय ठरल्या आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक मीम व्हायरल झाले आहे.
यावेळी मात्र त्यांनी केलेली जाहिरात मात्र लोकांना आवडली नाही. कारण शनिवारवाड्याच्या परिसरात बुरूज दिसणार नाहीत या पद्धतीने मोठ्या मोठ्या होर्डिंग लावून विद्रूपीकरण करण्यात आले होते. (Punit Balan News ) त्यामुळे या प्रकारावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली.
दरम्यान, सोशल मीडियावर झालेल्या विरोधाची दखल अखेर पुणे महानगर पालिकेने घेतली. या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी आल्या. (Punit Balan News ) यावर सकारात्मक पाऊल उचलत पालिकेने बालन यांच्यावर दंड आकारला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवडा कारागृहातील पोलीस शिपायावर गुंडाचा जीवघेणा हल्ला
Pune News : गेट उघडण्यास उशीर झाला; सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण