पुणे : Pune University – गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठात एका रॅपरने अश्लील शुटींग केले त्यावरुन हे वादंग उठले आहे. (Pune University) दरम्यान या रॅपरवर अश्लील रॅप सॉंगचं शुटींग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चौकशीत रॅपरने जो काही खुलासा केल्या त्यावरून पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराचा प्रत्यय समोर आला आहे. (Pune University)
शुभम जाधव असे या रॅपरचे नाव
शुभम जाधव असे या रॅपरचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा शुभमने केला आहे. शुभच्या या दाव्यानंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.
हे शुटींग विद्यापीठातील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून करण्यात आलं होतं. त्यानंतर विद्यापीठातील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून अशा अश्लील रॅपचं शुटींग करायला परवानगी कोणी दिली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावरच आता रॅपर शुभमने स्पष्टीकरण दिलं आहे.
रॅपर शुभम सांगितले की, विद्यापीठाची परवानगी नसताना गाणं शुट केल्याचा आरोप खोटा आहे. माझ्याकडे शुटींग करण्यासाठी लागणारी रितसर परवानगी होती. फोनवरुन मला ही परवानगी मिळाली होती. विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिल्याचा दावा शुभमने केला आहे. या शुटींगसाठी लेखी परवानगी मागण्यासाठी आम्ही गेलो होतो. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून प्रफुल्ल यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली होती मात्र त्यांच्याकडून लेखी स्वरुपात आम्हाला कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
पुढे तो असेही म्हणाला, ‘या गाण्याचं सहा तास शुटींग सुरु होतं. राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांनी अश्लील गाणं शुट करण्यासाठी परवानगी का दिली?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर विद्यापीठाने मला कोणत्याही स्वरुपाची माहिती न देता पोलिसांत धाव घेतली. मात्र त्यापूर्वी जर विद्यापीठाने मला गाणं डिलीट करण्याची विनंती केली असती तर मी ते डिलीट केलं असतं. या रॅपमध्ये अश्लील शिवीगाळ आहे. मात्र शिवीगाळ करणं जर गुन्हा असेल तर भारतात गुन्हेगारांसाठी पोलीस ठाणे कमी पडतील. कलाकार समाजाचं प्रतिबिंब दाखवत असतं. याच समाजाचं प्रतिबिंब मी समाजाला दाखवलं आहे. शिवीगाळ करणं हा कोणाही गुन्हा नसल्याचं शुभमने म्हटलं आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार?
आता या प्रकरणी शुभमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याचीदेखील चौकशी होणार आहे. विद्यापीठाची अधिसभा भरते आणि सिनेटच्या बैठका होतात त्याच अधिसभेतील कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून दारुच्या बॉटल घेत अश्लील शिवीगाळ या रॅम सॉंगमध्ये दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
‘अथर्वशीर्ष’वरुन पुणे विद्यापीठात वैचारिक ‘तांडव’; नव्या वादाला तोंड फुटलं…!